सचिन जाधव
Amit Shah News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री लोकार्पण सोहळ्यास हजेरी लावली. कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थित दर्शवली. 'बाबासाहेबांनी शिवाजी महाराज त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले. त्यामुळे लोकांना माहिती झाला नाही, तर लोकांना शिवाजी महाराज कळले नसते, असे वक्तव्य केंद्रीय अमित शहा यांनी केलं. (Latest Marathi News)
अमित शहांच्या (Amit Shah) हस्ते शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थितहोते. पुण्यातील कात्रज या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली आहे त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शिंदेशाही पगडी कवड्याची माळ देऊन अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले, 'ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण कार्यक्रमात मला बोलावलं त्याबद्दल नमस्कार. आज जगभरातील शिवाजी महाराज शिवभक्तांसाठी मोठा दिवस आहे. आजच्या पेक्षा दुसरा दिवस मोठा असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम'.
'बाबासाहेब पुरंदरे यांना देखील नमन. त्यांनी आपलं जीवन शिवाजी महाराज जीवनासाठी समर्पित केलं. बाबासाहेबांनी शिवाजी महाराज त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले. त्यामुळे लोकांना माहिती झाला नाही तर लोकांना शिवाजी महाराज कळले पण नसते, असे अमित शहा म्हणाले.
'एकनाथ शिंदे, तुम्ही शिवसृष्टीचं काम थांबवणार नाही हे काम देवाचं काम आहे. शिवसृष्टीचं काम ठरवलेल्या वेळेतच पूर्ण होईल असा विश्वास आहे. शिवसृष्टी पाहिली, अनेकजणनी वाचलं नसेल पण या ठिकाणी आल्यावर शिवाजी महाराज समजतील आणि काही संदेश घेऊन जातील. शिवाजी महाराज नाव नाही विचार आहे, असे अमित शहा पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.