MLA Santosh Bangar
MLA Santosh Bangar Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्रालयातील सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ? बांगर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण

सूरज सावंत

MLA Santosh Bangar News: शिंदे गटाचे आमदार संतोष बागंर यांनी मंत्रालयातील गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्यूटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने याबाबत लेखी तक्रार आपल्या वरिष्ठांकडे नोंदवली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आमदार बांगर (Santosh Bangar) यांनी सामटिव्हीशी बोलताना आपली बाजू स्पष्ट करत असं काहीही घडलं नसल्याचा दावा केला आहे. (Santosh Bangar Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या (Mantralay) गेटवर सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केल्याची ही घटना २७ ऑक्टोबरची आहे. आमदार बांगर यांच्यासोबत त्यांचे १५ कार्यकर्ते होते. बांगर हे गार्डन गेटमधून मंत्रालायात जात होते. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांने बांगर यांच्यासोबत असलेल्या १५ कार्यकर्त्यांच्या एन्ट्री पासबद्दल विचारणा केली. यामुळे बांगर यांनी सुरक्षा कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. तुम्ही मला ओळखलं नाही का? अशी विचारणा त्यांनी सुरक्षारक्षकाला केली आणि त्या पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली.

याबाबत आमदार संतोष बांगर यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सामटिव्हीशी बोलताना त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. बांगर म्हणाले की, पोलिस बांधवाशी मी कुठल्याही प्रकारे हुज्जत घातली नाही. मी काल मंत्रालयात कार्यकर्त्यांसोबत जात होतो. तेव्हा सुरक्षारक्षकाने मला एन्ट्री करण्यास सांगितलं. तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे आमदार साहेब आहेत. सुरक्षारक्षकाने मला ओळखलं नव्हतं. पण नंतर त्याने मला ओळखलं आणि मला सन्मानाने जय महाराष्ट्र केला, कोणतीही हुज्जत झालेली नाही असा दावा बांगर यांनी केला आहे.

तसेच बांगर म्हणाले की, मी कोणताही वाद घातलेला नाही. त्याठिकाणी सीसीटीव्ही आहेत ते तपासावेत आणि सत्य समोर येईल असंही बांगर म्हणाले आहेत. कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीबाबत बांगर म्हणाले की, त्या कर्मचाऱ्याने घाबरुन तक्रारीची नोंद केली असावी, आमचा कोणताही वाद झालेला नाही.

याबाबत ठाकरे गटातील नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बांगर यांना टोला लगावला आहे. बांगर आणि वाद हे काही नवीन नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prasadacha Sheera : मऊ लुसलुशीत आणि गोड प्रसादाचा शिरा रेसिपी

PM Narendra Modi Rally: शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

Dubai Rain Alert : दुबईवर जलप्रलयाचं संकट! मुसळधार पावसाच्या शक्यतेने फ्लाईट्स रद्द, शाळा बंद

Today's Marathi News Live : अहमदनगर जिल्ह्यात खासगी बसला भीषण आग

Vangyach Bharit: झणझणीत! अस्सल गावरान वांग्याचं भरीत, खास रेसिपी

SCROLL FOR NEXT