Shiv Sena Shinde faction clash at Vakola branch during Ganesh Puja saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

Shiv Sena Leader Beaten In Party Office: मुंबईतील वाकोला-कलीना परिसरातील शिवसेना शाखेत गणेशपूजेदरम्यान वाद झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात शाखाप्रमुख संजय तेल्होरे आणि अश्विनी भोसले व त्यांचे पती संदीप भोसले यांच्या तक्रारींवरून दोन्ही बाजूंनी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Bharat Jadhav

  • गणेशपूजेदरम्यान वाकोला शिवसेना शाखेत दोन गटांमध्ये वाद

  • कलीना शिवसेना शाखेतील वादानंतर दोन्ही बाजूंनी FIR

  • संजय तेल्होरे अश्विनी भोसले संदीप भोसले वाद प्रकरण

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईतील सांताक्रुझ पूर्वेकडील कलीना परिसरात गणेश पूजेदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या दोन स्थानिक गटांमध्ये वाद झाला. या वादात शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला पक्षाच्या कार्यालयात मारहाण करण्यात आलीय. संजय महादेव तेल्होरे असे या शिवसेना नेत्याचे नाव आहे. ते शाखा क्रमांक ९१ चे शाखाप्रमुख आहेत. त्याच शाखेत त्यांना बांबूने मारहाण करण्यात आलीय. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी महिला विभागप्रमुख अश्विनी संदीप भोसले आणि त्यांचे पती संदीप भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

पोलिसांच्या माहितीनुसार १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी कलीना येथील शाखा क्रमांक ९१ मध्ये गणेश चतुर्थीनिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजा संपल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास महिला विभागप्रमुख अश्विनी भोसले दर्शनासाठी शाखेत आल्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती संदीप भोसले हेही शाखेत जात होते. यावेळी शाखाप्रमुख संजय तेल्होरे यांनी संदीप भोसले यांना शाखेत येण्यास विरोध केला.

वादाचे रूपांतर मारामारीत

संदीप भोसले हे पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगत त्यांना आत येण्यापासून रोखण्यात आले. दोघांमध्ये मोठा वाद झाला त्यानंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. तक्रारीनुसार, अश्विनी भोसले यांनी तेल्होरे यांना धक्का देत शिवीगाळ केली. त्यानंतर संदीप भोसले यांनी तेल्होरे यांना चापट मारली. आणि त्यांना जमिनीवर पडले. त्यानंतर दोघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असा आरोप करण्यात आला आहे.

हा प्रकार सुरू असताना शाखेचे उप शाखाप्रमुख प्रवीण दंतू गवळी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद आणखी वाढला. अश्विनी भोसले यांनी शाखेबाहेर पडलेला जड बांबू उचलून संजय तेल्होरे आणि प्रवीण गवळी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत तेल्होरे यांच्या छातीला, तर गवळी यांच्या मनगटाला दुखापत झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संदीप भोसले यांनी दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे.

घटनेच्या वेळी परिसरात गस्त घालत असलेल्या वाकोला पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना वेगळे करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय तेल्होरे यांच्या तक्रारी तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे वाकोला पोलिसांनी अश्विनी भोसले आणि संदीप भोसले यांच्याविरोधात BNS कलम 118(1), 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकोला पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा

Cholesterol : सुका मेवा हृदयासाठी धोकादायक? 'या' ५ सवयींमुळे वाढू शकतो कोलेस्ट्रॉलचा धोका

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT