shinde Government news
shinde Government news  saam tv
मुंबई/पुणे

कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या 'या' कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह सहाय्य मिळणार; सरकारची मान्यता

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

shinde Government news : राज्यातील 'अ' आणि 'ब' महानगरपालिका वगळता 'क' आणि 'ड' महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद/नगरपंचायती क्षेत्रातील कोविड विरोधी मोहिमेत कर्तव्य पाडताना कोरोनाने (Corona) लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य /लवमा कवच लागू करण्यात आला होता.

सदर निर्णयाला ४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्य शासनाने मान्यता दिली होती. या निर्णयात राज्य मंत्रिमंडळाने बदल करत स्थानिक स्वराज्य संस्थामधील अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सामावेश करण्यात आला आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधील अधिकारी/कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .

स्थानिक स्वराज संस्थामधील सफाई कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी , मानधन तत्वावरील कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना सदर निर्णयातील कर्मचाऱ्यांमध्ये सामावेश करण्यात आला आहे.

या योजना राज्यातील 'अ' आणि 'ब' महानगरपालिका वगळता 'क' आणि 'ड' महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद / नगरपंचायती यांना लागू करण्यासाठी वित्त विभागाने तरतूद उपलब्ध केली आहे. वित्त विभागाकडून ३९.५० कोटी हे २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे वितरीत करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT