Eknath Shinde, Amit Shaha
Eknath Shinde, Amit Shaha Saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे गटाची मंत्रिपदावरून नाराजी; मुख्यमंत्री भाजपश्रेष्ठींच्या चर्चेसाठी दिल्लीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतली भेट असल्याचे बोलले जात आहे. आज रात्री उशीरा शाहांच्या घरी भेट झाली. ही भेट तब्बल ४० मिनिटे चालली. या भेटीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थितीची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला मिळालेल्या खात्यांबाबत असमाधानी असल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण भागाशी निगडित एखाद दुसरे खाते मिळावे अशी शिंदे गटातील मंत्र्यांची इच्छा आहे. शिंदे गटाकडे आता कृषी आणि फलोत्पादन ही दोनच खाती ग्रामीण भागाशी सबंधित आहेत. ग्राम विकास, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम यापैकी एक खाते शिंदे गटाला हवे आहे, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप पक्षश्रेष्ठीशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडणार

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली सुनावणी लांबणीवर पडली आहे. ठकरे (Uddhav Thackeray) गटाने अजुनही निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडलेल नाही. २७ सप्टेंबर च्या सुनावणीत ठाकरे गट आपलं म्हणणं मांडणार आहे. २३ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडण्याची मुदत संपत असताना उद्धव ठाकरे यांच्या गटाने आम्ही आमचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयात मांडू अशी भूमिका घेतली आहे.

२७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सुनावणी होणार असून, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ७ सप्टेंबरची सुनावणीत आम्ही २७ सप्टेंबर ला संपूर्ण प्रकरणाच्या तपशीलवार सुनावणी घेऊन शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वांचे थोडक्यात युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात येईल असं सांगितलं होतं.

जोपर्यंत चिन्हाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय घेऊ शकते की, नाही हे २७ सप्टेंबरच्या सुनावणीत न्यायालय ठरवणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT