shinde-Fadnavis Cabinet Expansion saam tv
मुंबई/पुणे

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? अमित शाहांकडूनही हिरवा कंदील

Cabinet Expansion: अनेकजणं मागील 10 महिन्यापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याची महिती आहे. ऑगस्ट 2022मध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 -9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 15 मे नंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनीही या मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे यावेळी हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळेल?

शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या अनेक नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे. या इच्छुकांची यादी मोठी आहे. काहींना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली. पण अनेकजण मागील 10 महिन्यापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून (शिंदे गट) बच्चू कडू, भरत गोगावले, यामिनी जाधव, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर या नेत्यांना संधी मिळू शकते. येत्या 15 मे आधी राज्यातील संत्तासंघर्षावरील निकाल येण्याची शक्यता आहे. या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पहिला मंत्रिमंडळ विस्तार

पहिला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट रोजी झाला होता. पहिला मत्रिमंडळात एकूण 18 आमदारांना मंत्रिपद मिळाले होते. भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी 9-9 मंत्रिपदं मिळाली होती. अजूनही 20 ते 22 मंत्रिपदं बाकी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Maharashtra News Live Update : पुण्यात 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दिला चोपलं

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8 व्या वेतन आयोगामुळे HRA मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता; कसे असेल कॅल्क्युलेशन?

Maharashtra Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खरंच फूट पडली का? सुनील तटकरेंनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण

Mumbai : विरारमध्ये भयंकर घडलं, अर्नाळा समुद्रात ४ मुलं वाहून गेली

SCROLL FOR NEXT