Deepak Kesarkar news
Deepak Kesarkar news  saam tv
मुंबई/पुणे

Deepak Kesarkar|शिंदे गट - भाजपमध्ये पहिली ठिणगी; भाजप आणि राणेंचं नाव घेत केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

साम टिव्ही ब्युरो

जयश्री मोरे

मुंबई : राज्यात मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना नेत्यांकडून शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. तर शिवसेनेचे महत्वाचे शिलेदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष मोठा संकटात सापडला आहे. त्यात राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेवर आले आहेत. याचदरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपने (BJP) ठरवून आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सुशांत सिंग प्रकरणात बदनामी केली, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी केला आहे. (Deepak Kesarkar news)

शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. केसरकर पत्रकार परिषदेत म्हणाले , सुशांतसिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांची ठरवून बदनामी केली गेली. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सहभाग होता. यामुळे मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तूस्थिती घालून राणे काय बोलत आहे, हे सांगितले. त्यावेळी त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या संवाद सुरू झाला. त्यानंतरच त्यांची भेट झाली'.

केसरकर पुढे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते. परंतु नंतर १२ आमदारांचे निलंबन झाले. त्यानंतर नारायण राणे यांचा केंद्रात घेतले गेले. यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. सदर बाब केवळ दोन-तीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरेही होत्या'. तसेच उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मोठी ऑफर दिल्याचेही केसरकरांनी सांगितले. 'एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, आपण एकत्र येऊ, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले. पण भाजप तयार झाली नाही', असे ते म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर भाष्य करताना केसरकर म्हणाले, 'पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हेही या निकालवरून समजेल. त्यासाठी विस्ताराला वेळ झाला तरी चालेल. पण सुप्रीम कोर्टाचा आदर राखणं गरजेचे आहे आणि तो आमच्याकडून राखला जातोय. त्यामुळं विस्तार केला नाही. सोमवारी अंतरिम आदेश येईल व त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कोर्टाचा मान ठेवावा असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना वाटते'.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. तरी ते लोकांबरोबर जातात. लोकांना भेटतात. त्यामुळे आमचं टेन्शन वाढतं. असं मला एका जेष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, असेही ते म्हणाले. केसरकरांच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेना आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT