दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी:
Dehugaon pregnant woman murder case : मावळ तालुक्यातील देहूगाव येथे एका विवाहितेच्या मृत्यूच्या घटनेला आता गंभीर वळण मिळाले आहे. शेतजमीन खरेदीच्या पैशांवरून झालेल्या वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पतीविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत २८ वर्षीय शुभांगी आकाश बारसकर यांचा मृत्यू झाला असून, त्या तीन महिन्यांच्या गरोदर होत्या, असा उल्लेख पोलिसांमधील फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास देहूगावातील रामचंद्र यदू राऊत यांच्या भाड्याच्या खोलीत घडली.
फिर्यादीनुसार, गावाकडे शेतजमीन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशांना शुभांगी यांचा विरोध होता. याच कारणावरून तसेच इतर छोट्या-मोठ्या कौटुंबिक कारणांवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. याच वादातून आकाश यांनी धारदार शस्त्राने शुभांगी यांच्या गळ्यावर वार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पती आकाश रामदास बारसकर (वय ३१) यांच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३३५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेनंतर आरोपी आकाश बारसकर हे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हत्येमागील नेमका घटनाक्रम, वादाचे स्वरूप आणि इतर परिस्थितीबाबत देहूरोड पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.