रश्मी पुराणिक, साम टिव्ही
मुंबई : राज्यात एकीकडे दररोज राजकीय घडामोडी घडत असताना, राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि सेलची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. हा निर्णय नेमका का घेण्यात आला आहे, याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. (NCP Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी सगळ्या सेलच्या प्रमुखांना याबाबतचं पत्र दिलं आहे. या पत्रात कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचं सांगण्यात नमूद करण्यात आलं आहे. विविध निवडणुकींच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रफुल पटेल यांनी ट्वीट करत हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर असल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नसल्याचंही पटेल यांनी सांगितलं. (Sharad Pawar Latest News)
दरम्यान, फक्त राष्ट्रीय पातळीवरील सेल बरखास्त केले आहेत. नव्याने निवड करण्यासाठी हे सेल बरखास्त केले आहेत. राज्यातील सेल अथवा विभागात कोणताही बदल नाही. अशी माहिती प्रफुल पटेल यांनी ट्वीट करत दिली आहे.
हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचा विजय - अजित पवार
सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यास आज मान्यता दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी स्वागत केलं. राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे. असं अजित पवार म्हणालेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ,धनंजय मुंडे,विजय वडेट्टीवार तसंच अन्य नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली. मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीतून राज्यात आम्ही सुरु केलेली ओबीसी आरक्षण व सामाजिक न्यायाची लढाई यापुढेही सुरु राहील, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.