Sharad Pawar Ajit pawar Saam TV
मुंबई/पुणे

Todays NCP Meeting: शरद पवार की अजित पवार? राष्ट्रवादीत 'बॉस' कोण? आज होणार फैसला!

Sharad Pawar vs Ajit Pawar: राष्ट्रवादीत खरा बॉस कोण? कोणाकडे किती आमदार? हे आजच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pawar vs Pawar: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही, तर आमच्याकडे सर्वाधिक आमदारांचं बळ असून राष्ट्रवादी पक्ष आमचाच आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून दोन गट पडले आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे दोन बडे नेते शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) आज आणने-सामने येणार आहेत.

अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) या दोन्ही नेत्यांकडून आज (५ जुलै) मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत खरा बॉस कोण? कोणाकडे किती आमदार? हे आजच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सकाळी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यामध्ये तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता मुंबई पोलिस घेत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावल्या आहे. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दुपारी १ वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

दुसरीकडे अजित पवार यांच्या बाजूकडूनही बैठकीसाठी निमंत्रणे देण्यात आलेली आहेत. या बैठकीसाठी जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी रात्रीच रवाना झाल्याचे सांगण्यात आले. आता दोन्ही बैठकींपैकी कोण कोणत्या बैठकीत दिसणार, यावर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार की अजित पवारांसोबत, हे स्पष्ट होणार आहे.

दोन्ही गटांकडून व्हीप जारी

दरम्यान आजच्या बैठकीसाठी दोन्ही गटाने बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला तर अजित पवार यांच्याकडून अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांनी देखील व्हीप जारी केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT