Sharad Pawar On Homework Politics Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar: सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये असं सत्ताधाऱ्यांचं धोरण; 'गृहपाठ'वरून शरद पवारांनी घेतली 'शाळा'

Sharad Pawar On Homework Politics: "सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे" असं शरद पवार म्हणाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

पुणे: राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. याबाबत सर्वच स्तरातून राज्य सरकारवर टीका होतेय. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही आता राज्य सरकारवर टीका केली आहे. "सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे" असं शरद पवार म्हणाले आहेत. पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. (Sharad Pawar Latest News)

राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून गृहपाठ (Homework) देणे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी स्वतः याबाबत माहीती दिली होती. त्यामुळे सध्या राज्य सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याबाबत शरद पवारांनीही राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, "सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे.

सरकारने पुस्तकांवर जीएसटी लावला असंही शरद पवार म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली आहे. राज्यपालांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही शरद पवारांनी दिला आहे. राज्यपाल अत्यंत वाईट भाषेत बोलले यावरुन त्यांची मानसिकता दिसते अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

पुण्यातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशनच्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, संस्था आणि धर्मादायामध्ये सुसंवाद ठेवणे गरजेचे. दिड वर्षांपूर्वी १-२ जिल्ह्याच्या लोकांसोबत बैठक घेतली त्याचा प्रचंड फायदा झाला. धर्मदाय कार्यालयाशी सुसंवाद ठेवला तर संस्थांना मोठा लाभ होतो, हे अनेकदा पाहिलेलं आहे. देवस्थानच्या मालकीचे प्रश्न वाढलेत, ते निकाली कसे काढता येतील याकडे लक्ष द्यायला हवं. कारण गावागावात जागांवरून संघर्ष पाहायला मिळतो, तो मिटायला हवा असं शरद पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की केंद्र सरकार, राज्य सरकार, संस्था चालक आणि धर्मदाय यांच्यात सुसंवाद कसा ठेवता येईल? या दृष्टीने विचार करायला हवा. त्यावेळी संस्था आणि धर्मदाय यांच्या सर्व प्रश्नांची उकल होईल. कायमची यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी आपण सर्वोतोपरी दक्षता घेऊयात. अनेकजण न्यायालयात जातात, मी त्यांना विचारलं तुम्ही न्यायालयात का जाता? तर त्यांचं म्हणणं आहे की, जो कर आमच्याकडून घेतला जातो तो आम्हाला अमान्य आहे. याबाबत त्यावर आपण तोडगा काढला तर धर्मदायचा अडकलेला निधी उपयोगात येईल असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशन पुणे यांचे वतीने बालगंधर्व रंगमंदीर येथे विश्वस्त परिषद 2022 चे आयोजन करण्यात आलेले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासदार शरद पवार होते. यामध्ये राज्यभरातील विश्वस्थ संस्था, प्रतिनिधी, वकील, धर्मदाय आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT