Sharad Pawar: यापुढे गर्दी जमणारे कार्यक्रम स्विकारणार नाही  
मुंबई/पुणे

Sharad Pawar: यापुढे गर्दी जमणारे कार्यक्रम स्विकारणार नाही

देशातील 60 टक्के सहकार महाराष्ट्रात आहे. सहकारात महाराष्ट्र आणि गुजरात अग्रेसर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : ''मुख्यमंत्र्यांचे आवाहन योग्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यापुढे हजारो संख्येने लोक असतील ते कार्यक्रम स्वीकारणार नाही स्पष्ट केलं. गेलो तरी हॉलमधील कार्यक्रमाला जाणार. तिथे खुर्च्यांमधील अंतर असेल तरच जाणार, असं त्यांनी जाहीर केलं. पुण्यात (Pune) आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

याचवेळी त्यांनी राज्यातील सहकार क्षेत्रावरही भाष्य केलं. ''सहकारी बँका उभारण्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. देशातील 60 टक्के सहकार महाराष्ट्रात आहे. सहकारात महाराष्ट्र आणि गुजरात अग्रेसर आहे. सहकारी बँकांनी पुढे आलं पाहिजे. सहकार जगलाच पाहिजे. 'एनपीए' बँकांचं आरोग्य दर्शवतं. 'कर्ज देताना कर्जफेडीची क्षमताही तपासावी', अशी भुमिकाही त्यांनी मांंडली.

हे देखील पहा-

दरम्यान यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्यभरातील अनेक घडामोडींवर भाष्य केले. महाराष्ट्रात एवढ्या ईडीच्या केसेस यापुर्वी कधीही पाहिल्या नव्हत्या. विरोधकांना नमवण्यासाठी केंद्रसरकार अंमलबजावणी संचलनालयाचा (ईडी) वापर करत आहे. एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरू आहेत. ठिक आहे. काळ येतो आणि जातो. काळ जाईल तेव्हा त्यात दुरुस्त्या होतील, अशा शब्दातं त्यांनी केंद्रसरकारला इशाराच दिला.

तसेच, ईडीच्या या कारवायांचा मुद्दा आपण संसदेत मांडणार असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी जाहीर केलं. याबाबत बोलताना पवार म्हणाले, “गैरव्यवहार प्रकरणी तपास करण्यासाठी आपल्या देशात आयोग आहेत. त्यांच्याकडे किंवा राज्य सरकारचं गृह खात्याकडे याबाबत तक्रार केली जाऊ शकते. राज्याकडे तपासाची यंत्रणा असताना ईडीनं ईडीने त्या संस्थामध्ये हस्तक्षेप करणं हे राज्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे. त्यामुळे संसदेच्या आगामीअधिवेशनात आपण या गोष्टी मांडणार असल्याचं यावेळी शरद पवार यांनी यावेळी नमूद केलं.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT