Ajit Pawar and Sharad Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

pune politics : महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरेंपाठोपाठ पवार काका पुतण्या एकत्र येणार आहेत... त्याचे संकेत सुळेंनी दिलेत.. मात्र सुळेंनी नेमकं काय म्हटलंय.. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींमुळे निष्ठावंतांच्या कशा प्रतिक्रिया उमटल्यात ?पाहूयात...

Bharat Mohalkar

महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय... त्यातच गेल्या महापालिका निवडणुकीत ढासळलेला पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती... मात्र आता थेट सुप्रिया सुळेंनीच दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीचे संकेत दिलेत...

खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी दोन्हीही पक्ष तुल्यबळ आहेत... तर पवारांच्या राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग या भागात आहे... मात्र भाजपनं मुंबई आणि पुण्यातील युतीच्या चर्चेतून अजित पवारांना वगळलं.. आणि दोन्ही राष्ट्रवादींनी युतीची चर्चा सुरु केलीय... मात्र आता या युतीविरोधात पक्षातूनच आवाज उठायला सुरुवात झालीय.. अजित पवारांसोबत युतीच्या चर्चा सुरु असल्यानं प्रशांत जगतापांनी थेट शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.. तर काँग्रेसनंही पुण्यात महायुतीतील पक्षांसोबत युतीला विरोध दर्शवलाय...

मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपसमोर कसं आव्हान उभं राहू शकतं पाहूयात....

2017 मध्ये भाजपने 25 वर्षापासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीचा पराभव करत 162 पैकी 97 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादीचा 39 जागांवर विजय झाला होता... दुसरीकडे शिवसेनेला अवघ्या 10 जागांवर तर 9 जागांवर काँग्रेस विजयी झालं होतं. अशातच महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मतविभाजन टळून भाजपपुढे आव्हानं निर्माण होईल... तसचं पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर थांबवणं दोन्ही पक्षांना शक्य होईल...

राज्यात भाजप आक्रमकपणे निवडणुका लढवत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत... त्याची घोषणा 26 डिसेंबरला होण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत... मात्र ठाकरेंपाठोपाठ पवार काका-पुतण्यांची सत्तेसाठीची युती पुणेकरांना मान्य होणार का? याबरोबरच निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबवून दोन्ही राष्ट्रवादी भाजपच्या ताब्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका जिंकणार का? याचीच उत्सुकता लागलीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात 'इतका' होणार फिटमेंट फॅक्टर; समोर आली अपडेट

Ajit Pawar Biopic : माझा बायोपिक निघाला तर...'; अजितदादांनी स्वतःच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव, पाहा VIDEO

Health Care : हिवाळ्यात हळदीचे दूध कोणी पिऊ नये? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला या ५ घटकांनी करा शिवलिंगावर अभिषेक; आयुष्यभर राहील महादेवाची कृपा

SCROLL FOR NEXT