ajit pawar, sharad pawar, shirur saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पतंप्रधान नरेंद्र माेदींच्या भेटीपुर्वी अजित पवारांचे माेठं विधान (पाहा व्हिडिओ)

तरुणांना राजकारणात संधी देण्यासाठीचे संकेतही अप्रत्यक्षरित्या आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.

रोहिदास गाडगे

Ajit Pawar News : साहेब आणि दादा तेव्हाही वेग वेगळे नव्हतो, आजही नाही. काळजी करु नका असे आज (मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी शिरुर येथे एका कार्यक्रमात बाेलतना नमूद केले. यावेळी शिरुर मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित हाेते. (Maharashtra News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज शिरूर-हवेलीचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचार्णे यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी शिरुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीवेळी शरद पवारांचे समर्थक म्हणुन पोपटराव गावडे तर बाबुराव पाचर्णे अजित पवारांचे (ajit pawar) समर्थक असल्याचा शिरुरमध्ये प्रचार झाल्याचे खुद अजित पवारांनी सांगत दाखला दिला. मात्र आम्ही त्यावेळीही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही काळजी करु नका असे सांगत अजित पवारांनी आज मोठा गाैप्यस्फाेट केला.

तरुणांना संधी..

वडिलधाऱ्यांच्या आशिर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली तरुणांनी राजकारण आणि समाजकारणात यायला हवं. तरुणांनी शिकलं पाहिजे. पुर्वीपासून राजकारणात तरुणांमध्ये एक वेगळं आकर्षक आहे.

त्यामुळे तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी तरुणही सक्रिय राजकारण व समाजकारणात यायला हवेत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तरुणांना राजकारणात संधी देण्यासाठीचे संकेतही अप्रत्यक्षरित्या आज शिरुरमध्ये दिले.

शरद पवार यांनी सवय लावली

अजित पवारांच्या भल्या सकाळी सुरु होणा-या कार्यक्रमावरुन विचारलं जातं या प्रश्नावर अजित पवार म्हणाले शरद पवार (sharad pawar) यांनी सकाळी लवकर कामाला सुरवात करण्याची सवय लावली आहे. शेवटी आपण लोकांना कशा सवयी लावतो यावर अवलंबून असतं म्हणुनच सकाळी सातलाच कामाला सुरवात करत असल्याचे स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shepuchi Bhaji Recipe : शेपू नाव ऐकताच मुलं नाक मुरडतात? मग 'ही' भाजीची रेसिपी ट्राय कराच

iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रो वर खास ऑफर! १८,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची सुवर्ण संधी

Independence Day 2025 Live Update: आजपासून युवकांसाठी १ लाख कोटींची नवीन योजना लागू- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Arijit Singh : शूटिंगदरम्यान हाणामारी अन् अंगठी चोरल्याचा आरोप; अरजित सिंहविरोधात पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! आता ५१००० नाही तर ३०००० होणार बेसिक सॅलरी; नवीन रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT