Sharad Pawar & Chandrakant Patil  Saam TV
मुंबई/पुणे

शरद पवारांचा नेहमीच जातीवाद निर्माण करायचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

आज सकाळी ईडीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी नेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून नवाब मलिक (Nawab Malik) आणि काँग्रेसवरती टीका केली आहे. काँग्रेसकडे टीका करण्यासाठी विषय नाहीत म्हणून अर्थहीन चर्चा करतात. आमचा येणाऱ्या महापालिकेत मुद्दा हाच आहे ५० वर्ष विरुद्ध ५ वर्ष. आम्ही काय केलं सांगू तुम्ही काय केलं ते सांगा असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) यावेळी अतिशय धक्कादायक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की पवार साहेबांचा नेहमीच प्रयत्न राहिलाय की समाजात जातीवाद निर्माण करायचा.

आज सकाळी ईडीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी नेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कसलीही नोटीस नसताना ईडीने (ED) त्यांना नेलं कसाकाय असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की ईडी सूडबुद्धीने कारवाई करते हे विरोधकांनी म्हणायच नसतं.

एखादी चौकशी सुरू आहे यावर बोलणं योग्य नाही, अशा केसमध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे, एकही केस न्यायालयात जिंकू शकले नाहीत, का जात नाहीय न्यायालयात असा प्रश्नही चंद्रकांत पाटलांनी विचारला. जे लोक गलिच्छ बोलतात त्यांना परवानगी आणि मी तर सुसंस्कृत बोलतो. निवडणूका म्हटलं की अंदाज असतोच. भुजबळ दोन वर्षे जेलमध्ये होते त्यांना कोणी भेटायलाही जात नव्हते. देशमुख म्हटले तोंड उघडले जाईल ते कळेल लवकरच असेही पाटील म्हणले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT