Sharad Pawar and Ajit Pawar’s strategic moves add a new twist to Mumbai BMC election politics. Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई महापालिकेसाठी 'पॉवर पॅटर्न'? काका-पुतण्याने टाकला नवा डाव

Mumbai BMC Elections: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलीय... मात्र दुसरीकडे मुंबईतही पवार काका पुतण्यांनी पॉवर गेम खेळलाय..हा पॉवर गेम नेमका काय आहे... आणि त्याचा नेमका कुणाला फटका बसण्याची शक्यता आहे.

Suprim Maskar

मुंबई महापालिका निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाकरेंसोबत युती केलीय... मात्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 12 जागा आल्यानं नाराजीनाट्य उफाळून आलंय.. दरम्यान ठाकरे बंधूंसोबत युतीत निवडणुका लढवणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीनं वेगळाच पॅटर्न वापरलाय... उमेदवारी न मिळालेल्या नाराजांना थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन निवडणूक लढवण्याचा सल्ला दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनीबेन पांचाल, जितेंद्र आव्हाडांचा निष्ठावंत कार्यकर्ता नितीन देशमुख आणि सरचिटणीस अशोक पांचाल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय..

विशेष म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आलीय.. दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडत असल्याच्या मुद्द्यावर ठाकरेसेनेनं मात्र हात वर केलेत... मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं जागांवर तोडगा काढण्याचा सल्ला ठाकरेसेनेनं दिलाय...

ठाकरेसेनेच्या या सल्ल्यानंतर संतापलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा राखी जाधव यांनी विजयाची खात्री देत असलेल्या भाजपात प्रवेश केलाय... मात्र पवार काका-पुतण्याच्या या पॉवर गेमचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे?

मुंबईत ठाकरेंच्या व्होटबँकेत आणखी एक वाटेकरी होणार

पवारांचे उमेदवार दादांकडे गेल्यास ठाकरेंना फायद्याऐवजी तोटा होण्याची शक्यता

इच्छुकांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्ते कायम ठेवण्यासाठी मदत

मात्र काका पुतण्याच्या या पॉवर पॅटर्नमुळे महायुतीलाच बुस्टर मिळून ठाकरेसेनेची कोंडी होण्याची शक्यताच जास्त आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT