Sharad Mohol Case Update News Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Mohol: मोठी बातमी! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

Sharad Mohol Case Update News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय बडवे

Sharad Mohol Case Update News:

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. शिरवळ मधून पोळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोळेकर हा पळून जात असताना पुणे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून बेड्या ठोकळ्याची माहिती मिळत आहे.

आरोपी मुन्ना पोळेकर यांच्याकडून पोलिसांनी ३ पिस्टल जप्त केल्या आहेत. ज्या पिस्टलने शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता, ती पिस्टल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या २ दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, यातील आरोपींचे शरद मोहोळशी जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते. याचाच बदला घेण्यासाठी आज या आरोपींनी शरद मोहोळ याला जिवे मारण्याचा कट रचला होता.  (Latest Marathi News)

दरम्यान, शरद मोहोळ याच्या हत्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची ९ तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. यानंतर आता पोलिसांना हे मोठं यश मिळालं आहे.

कोण होता शरद मोहोळ?

दरम्यान, शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी पिंटू मारणे हत्येप्रकरणी मोहोळला अटक केली होती. याच हत्या प्रकरणात तो जामिनावर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT