Shambhuraj Desai reaction to Chhagan Bhujbal Maratha reservation statement Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: छगन भुजबळांना समज द्यावी, परिस्थिती खराब होऊ शकते; शिंदे गटाचं अजित पवारांना आवाहन

Shambhuraj Desai News: छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांवर शिंदे गटाने देखील उघडपणे नाराजी व्यक्त केली.

Satish Daud

Shambhuraj Desai on Chhagan Bhujbal Statement

राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे विरोध दर्शविला आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून छगन भुजबळ यांना वेळीच आवरा, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. दरम्यान, भुजबळांच्या वक्तव्यांवर शिंदे गटाने देखील उघडपणे नाराजी व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचा विचार सरकारने केला आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल (सोमवारी) केलेलं विधान विधान आश्चर्यकारक असल्याचं शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार यांनी छगन भुजबळांना समज द्यावी, असं देखील शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे.

शंभुराजे देसाई यांनी आज पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण होईल, असं विधान भुजबळांनी करणं चुकीचं आहे. यामुळे राज्यात परिस्थिती खराब होऊ शकते. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत. कदाचित उद्याच मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यामध्ये आम्ही चर्चा करू, असं शंभुराजे देसाई म्हणाले.

छगन भुजबळ यांचे वक्तव्य बिलकुल योग्य नाही. आपलं म्हणणं त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडायला हवं, असे माध्यमांवर बोलू नये. भडक वक्तव्ये करणारी भूमिका भुजबळ यांची नेहमीची असते. पण आता त्यांनी असे करू नये. अजितदादा यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. आम्ही अजितदादांना उद्या भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की अशी वक्तव्य करू नये, अशी आक्रमक भूमिका शंभूराज देसाई यांनी घेतली.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

मंत्री छगन भुजबळ सोमवारी बीड दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी जाळपोळीची पाहणी केली. दरम्यान, परत येताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारपरिषद घेतली. राज्य सरकारच्या शिंदे समितीवर आमचा आक्षेप आहे. माजी न्यायमूर्ती जरांगेंच्या भेटीला जातात, हे चुकीचं आहे. आमचे मंत्री, आमदार जरांगेंच्या भेटीला जातात त्यांना ओबीसींची मतं नकोय का? गुन्हा मागे घेण्याची मागणी करणं आणि गुन्हे मागे घेणं हे चांगलं नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे, सातारा अन् अहिल्यानगरला अवकाळीने झोडपलं; विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस; शेतकऱ्यांचं उरलं-सुरलं पीकही...

CM फडणवीसांकडून संभाजीनगरला मोठं गिफ्ट! EV चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प अन् AC बस; कोट्यावधी विकासकामांचे लोकार्पण

Maharashtra News Live Update: उद्घाटनापूर्वीच मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महायुतीची राजकीय खेळी; जळगावसह सोलापुरातील 6 जागा बिनविरोध

DA Hike 2026: पेन्शनमध्ये थेट 3% वाढ! 60% वरून DR झाला 63%, तुमच्या खात्यात आता किती रुपये जमा होणार?

SCROLL FOR NEXT