Sanjay Raut  Saam
मुंबई/पुणे

Sanjay Raut : संजय राऊतांनी राजीनामा द्यावा अन् पालिका निवडणूक लढवावी, शिंदेंच्या आमदाराचं आव्हान

SHAMBHURAJ DESAI CHALLENGES SANJAY RAUT: राज ठाकरे यांच्या ९६ लाख खोट्या मतदारांच्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई यांचा पलटवार. “पुरावे द्या, निवडणूक आयोग कारवाई करेल,” असं सांगतानाच संजय राऊत यांना खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या वॉर्डातून निवडणूक लढवण्याचं आव्हान ksns

Namdeo Kumbhar

ओंकार कदम, साम टीव्ही प्रतिनिधी सातारा

shambhuraj desai challenges sanjay raut to fight bmc election : राज ठाकरे यांनी 96 लाख खोटे मतदार यादीत असल्याबाबत टीका केली होती, याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी जर 96 लाख खोटे मतदार असतील तर त्यासाठी त्यांनी पुरावा द्यायला हवा.. आता हरकती घेण्याची मुदत संपून गेली आहे, अशी काही माहिती मनसेकडे आली असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करावी. निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला अशा काही बाबींनी आढळून आल्या तर अहवाल मागितला होता. चुकीचा असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल. असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

निवडणूक आयोग हा एक स्वायत्त संस्था आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्यानंतर निवडणूक आयोग प्रत्येकावर बोलू शकत नाही. ते घटनात्मक पद आहे. सत्ताधारी हे वस्तुस्थिती मांडत आहेत. आम्ही याचे राजकीय भांडवल करत नाही. मागील लोकसभेला आम्हाला जागा कमी मिळाल्या महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. त्यावेळी आम्ही हरकती घेतल्या नव्हत्या. त्यामुळे वस्तुस्थिती स्वीकारले पाहिजे. तुमच्या जागा निवडून आल्या की मतदार यादी योग्य आणि आम्ही जिंकलो की मतदार यादीत घोळ ...याचा अर्थ भविष्यात त्यांना पराभव दिसू लागला आहे. म्हणून त्याची उत्तर आत्ता विरोधक तयार करू लागले आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

ठाणे, मुंबई या ठिकाणी गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार या संजय राऊतांच्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्ही लोकांच्यातून निवडून आलो आहोत. संजय राऊत यांच्यासारखी राज्यसभेवर बॅकडोर एन्ट्री केलेली नाही. संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या महानगरपालिकेच्या वार्डातून निवडून येऊन दाखव मग आमच्या ठिकऱ्या होणार का याचा विचार कर ... ठिकऱ्या कोणाच्या होणार याबाबत ठाणेकर जनता दाखवून देईल... ठाण्यात जो मागे मोर्चा काढला त्याला 400 लोकांच्यावर लोक नव्हते. सर्व लोक आणले ते बाहेरून आणले होते. संजय राऊत काय आहेत हे ठाणेकरांना चांगलेच माहित आहे. आता जे बहुमत आहे त्यापेक्षा जादा बहुमत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळेल. असे सडेतोड प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस भूमिका घेतली होती. त्यावेळेस देखील संजय राऊत यांनी मुंबईत येऊन दाखवा. असे विधान केलं होतं. आम्ही खुलेआम त्यावेळी वरळीतून वाजत गाजत गेलो त्यावेळी काय झालं. संजय राऊत जे बोलतात त्याचं अर्ध वाक्य जरी खरं ठरलं तरी आम्ही म्हणल ते ऐकू.... अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

संजय राऊत यांनी आनंद दिघे यांना तुळशी वृंदावन या केलेल्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो शेजारी आनंद दिघे यांचा फोटो लावत असतो. यावर पंधरा दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी काय विधान केलं होतं याबाबत मीडियाने पहावं.... आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची तुलना कोणाच्या बरोबर करत नाही.. मात्र आमचे श्रद्धास्थान आनंद दिघे आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीने हिंदुत्वाचे विचार जर कोणी पुढे नेले असतील तर त्या आनंद दिघे यांनी पोहोचवले आहेत. संजय राऊत हे सोयीस्कर बोलतायत कारण त्यांना माहित आहे. आपण बोलून चूक केली आहे. ठाण्यात गेल्यावर आपल्याला जोडे पडतील हे वाचण्यासाठी दिघे साहेबांना वृंदावन असं संबोधित आहेत. अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT