shah rukh khan  Saam tv
मुंबई/पुणे

Shah rukh Khan Mannat house : सैफआधी शाहरुख खानच होता निशाण्यावर? मन्नतमध्येही घुसखोरीचा प्रयत्न,धक्कादायक व्हिडिओ

Shah rukh Khan Latest news : सैफवर हल्ला झाल्यानंतर आता शाहरुख खानच्या मन्नतमध्येही घुसखोरीचा प्रकार समोर आलाय.. त्यामुळे शाहरुखच्याही जीवाला धोका असल्याची चर्चा रंगलीय.. मात्र प्रचंड सुरक्षा असलेल्या मन्नतमध्ये घुसखोरीचा प्रयत्न कसा झाला? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Vishal Gangurde

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या थेट घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.. त्यामुळे अख्खं बॉलिवूड हादरलंय..मात्र सैफवरील हल्ल्याआधी 14 जानेवारीला किंग खान शाहरुखच्याही मन्नत बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. त्यामुळे एकच खळबळ उडालीय... शाहरुख खानच्या घराची रेकी कशी करण्यात आली याची माहिती समोर आलीय.

शाहरूखच्या मन्नतमध्येही घुसखोरी?

14 जानेवारी

एका व्यक्तीने शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला

रिट्रीट हाऊसजवळ सीडी लावून मन्नतची रेकी

बंगल्याला सुरक्षा जाळी असल्याने घुसखोरीत अपयश

त्यामुळे आरोपीना वेळीच काढला पळ

काही दिवसांपासून आरोपी रेकी करत असल्याची सुत्रांची माहिती

पोलीसांनी सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केलीय.. तर दुसरीकडे पोलीसांनी मन्नतची पाहणी करून सीसीटीव्ही तपासले आहेत.. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच आरोपी होता की वेगवेगळे? याचा शोध घेण्याबरोबरच दोन्ही आरोपींमध्ये काही कनेक्शन आहे का? याचाही तपास पोलीसांकडून सुरु आहे... मात्र आधी सलमान खानला धमकी, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या एवढंच नाही तर सैफ अली खानवरही घरात घुसून हल्ला करण्यात आला आणि आता किंग खान शाहरुखच्या घराची रेकी यामुळे सेलिब्रेटींमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, सलमान खानला देण्यात येणाऱ्या धमक्या आणि बाबा सिद्दीकींची हत्या ही बिश्नोई गँगने केल्याचं समोर आलं.. मात्र सैफवरील हल्ला असो वा शाहरुख खानच्या घराची रेकी ही हल्ला करण्याच्या उद्देशाने करण्यात आली की चोरीच्या उद्देशाने आरोपीला अटक केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT