Ratnakar Mahajan Passes Away  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Ratnakar Mahajan Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Ratnakar Mahajan Passes Away : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन झाले. आज दुपारी १ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Dr Ratnakar Mahajan death news Pune : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांचे काल रात्री (शुक्रवारी) पुण्यात निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका अभ्यासू, सामाजिक आणि राजकीय विचारवंताचा प्रवास थांबला असून, राजकीय व सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

डॉ. रत्नाकर महाजन हे एक अभ्यासू राजकीय विश्लेषक आणि विचारवंत म्हणून ओळखले जात होते. त्यांनी १९९९ ते २००९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. राज्याच्या विकासाचे नियोजन आखण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांनी अनेक वर्षे पक्षाची बाजू अत्यंत खंबीरपणे आणि अभ्यासू वृत्तीने मांडली. याशिवाय, काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सामाजिक क्षेत्रात योगदान देताना त्यांनी ‘लोकबोधिनी’ या संस्थेचे अध्यक्षपदही भूषवले होते.

आज दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार:

डॉ. रत्नाकर महाजन यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी (१२ सप्टेंबर २०२६) दुपारी १ वाजता पुण्यातील नवी पेठ, डेक्कन येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मोठा मित्रपरिवार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि समर्थक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India : १२ हजार फूट उंचीवर तलाव अन् काठावर अनोखं गाव, डोळ्यांचं पारणं फेडणारे सौंदर्य

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्रीपूर्वी मोठी भेट? DA मध्ये 4% वाढीची शक्यता

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं कठीण

मोठी बातमी: मनोज जरांगे आज मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार, बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

SCROLL FOR NEXT