Sharad Pawar Ajit Pawar Meeting saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar - Ajit Pawar Meeting: शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट? अर्ध्या तासाच्या चर्चेत नेमकं काय झालं...

Pune News: शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट? अर्ध्या तासाच्या चर्चेत नेमकं काय झालं...

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar Ajit Pawar Meeting: एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी ही भेट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

याच दरम्यान आज एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार होते. मात्र अजित पवार यांनी या कार्यक्रमात येण्याचं टाळलं. यानंतर पुन्हा उलटसुलट राजकीय चर्चा सुरू असतानाच या दोन्ही नेत्यांच्या भेटीची बातमी सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि अजित पवार हे दोघे आज पुण्यात उपस्थित होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत व्हीएसआयमध्ये आज एक बैठक पार पडली. दुसरीकडे अजित पवार हे चांदणी चौकात पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. यानंतर या दोघांची भेट झाली, असं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. या बैठकीला या दोन्ही नेत्यांसोबत जयंत पाटील हे देखील उपस्थित असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात सुरू असलेल्या बैठकीतून शरद पवार हे बाहेर पडल्यानंतरही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT