Diwali Faral सागर आव्हाड
मुंबई/पुणे

कोरोनामुळे् घरातील सदस्य गमावलेल्या 1700 कुटुंबांचा शोध घेऊन केला अनोखा उपक्रम !

कोरोनामुळे ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे की अजूनही दु:खद परिस्थितीमध्ये आहेत.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : कोरोनाने किती कुटुंबातील किती जणांचा मृत्यू झाला, याबाबतची शासकीय माहिती अद्याप कुठेही उपलब्ध नाही. मात्र शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) मात्र या कुटुंबाची माहिती शोधन्याच्या कामाला लागले आणि त्यांनी कोरोनामुळे घरातील व्यक्ती गमावलेली एकुण 1700 कुटुंबे त्यांनी मतदार संघात शोधली आहेत.

हे देखील पहा -

तसेच यासाठी शासन पातळीवरून त्या कुटुंबीयांसाठी काय मदत करता येईल, यासाठी देखील ते प्रयत्नशील आहेतच मात्र कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुबीयांची यादी घेऊन पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत दिवाळीचा फराळ पोचविण्यीसाठीचा उपक्रम सुरू केला आहे. कोरोनाने ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे ते आजही दु:खद परिस्थितीमध्ये आहेत, त्यांच्या घरात यावर्षीची दिवाळी होणार नाही. त्यामुळे आमदार पवार यांनी शोधून काढलेल्या जवळपास 1700 कुटुंबांमध्ये, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांपर्यंत दिवाळीचा फराळ पोचविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

दरम्यान या उपक्रमासाठी मागील 8 दिवसांपासून त्या संपूर्ण शिरुर तालुक्यातील 93 गावांसह हवेलीतील 39 गावांत फिरत आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या घरी 2 स्टील डब्यांमध्ये लाडू, चिवडा व तत्सम फराळ त्या समक्ष देऊन त्यांचे दु:ख हलके करण्याचाही प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 90 टक्के कुटुंबापर्यंत फराळाचे वाटप झाले असून येत्या दोन दिवसांत उर्वरित कुटुंबापर्यंतही दिवाळी फराळ पोचेल, असे सुजाता पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संकटात राजकारण न आणता एकत्र यावं - उद्धव ठाकरे

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

Punha ShivajiRaje Bhosale: स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत...; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

IND W vs SL W: ना स्मृती मंधाना, ना हरमनप्रीत कौर; पण दिप्ती, अमनज्योत चमकल्या; वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतानं श्रीलंकेला चारली धूळ

Dhule Crime : धुळ्यात भररस्त्यावर लूट; दुकान बंद करताना व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लंपास

SCROLL FOR NEXT