Panvel News सिद्धेश म्हात्रे
मुंबई/पुणे

स्कूल व्हॅनला लागली आग; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

उड्डाण पुलाखाली एका स्कुल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे -

पनवेल : नवीन पनवेल उड्डाण पुलाखाली एका स्कूल व्हॅनने (School Van) अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आता पुर्ववत झाल्या आहेत. काही दिवसांपासून सुरु झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळेत (School) जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. आज सकाळीच मुंबईतील अनेक स्कूल बस पावसामुळे अडकून पडल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

अशातच आता नवीन पनवेल (Panvel) उड्डाण पुलाखाली एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. शहरातील कांडपिळे सीएनजी पंपामध्ये सीएनजी गॅस भरल्यानंतर ही स्कूल व्हॅन थोडी पुढे गेली असता अचानक व्हॅनने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.

पाहा व्हिडीओ -

अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये स्कूल व्हॅनचे मोठे नुकसान झालं आहे. सुदैवाने घटनेप्रसंगी व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असून यानिमित्ताने पुन्हा एकदा स्कूल व्हॅनमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT