School Reopen SaamTV
मुंबई/पुणे

School Reopen: शाळा सुरु करण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

शाळा सुरु करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवला.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील शाळा ज्या कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्या पुन्हा एकदा सुरु करण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीये (School education department sent a proposal to the Chief Minister regarding schools opening).

शाळा सुरु करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवला. येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. शाळा सुरु करण्याच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या.

"शाळा (School) सुरु कराव्यात अशी मागणी पालकांची आहे. स्थानिक प्राधिकारनांनी शाळा सुरु करायच्या का याचा निर्णय घ्यावा, असा निर्णय घेतला आहे. आम्ही शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांना पाठवला आहे. टास्क फोर्ससोबत बैठक घेत मुख्यमंत्री शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतील", असंही गायकवाड म्हणाल्या.

"आम्ही कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरु करण्यासाठी तयार आहोत, हे मुख्यमंत्री यांना कळवले आहे. रात्र शाळा सुरू करण्यासाठी उपसमिती तयार केली आहे. समितीमध्ये आमदारांचा समावेश केला आहे. त्यात चर्चा करत रात्र शाळा कशी सुरु करायची याचा निर्णय घेतला जाईल", अशीही माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अहिल्यानगरमधून कोणाचा विजय? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT