, SBI data breach latest news saam tv
मुंबई/पुणे

३.७५ लाख रेकॉर्ड्स चोरीला? SBI च्या ग्लोबल IT सेंटरमध्ये नेमकं काय घडलं?

SBI Global IT Centre Cyber Attack In Navi Mumbai: नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला झाल्याची तक्रार दाखल. ३.७५ लाख रेकॉर्ड्स चोरीला गेल्याचा दावा असून डेटा डार्क वेबवर प्रसारित केल्याचा आरोप. बेलापूर पोलीस तपास करत आहेत.

Omkar Sonawane

विकास मिरगणे, साम टीव्ही

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या डिजिटल सुरक्षेलाच सायबर हल्लेखोरांनी आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीबीडी बेलापूर येथील ग्लोबल आयटी सेंटरमधील सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश करून तब्बल ३ लाख ७५ हजार रेकॉर्ड्स चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरी करण्यात आलेला डेटा डार्क वेबवर प्रसारित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या सहा दिवसांच्या कालावधीत ही सायबर घुसखोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. एसबीआयच्या YONO 2.0 आणि RAAS या महत्त्वाच्या ॲप्लिकेशन्समधील ३२ CSV फाइल्स, दोन JSON फाइल्स आणि तब्बल २ हजार ७२१ PDF फाइल्स चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

बँकेच्या आयटी यंत्रणेत झालेल्या या कथित घुसखोरीमुळे ग्राहकांच्या डिजिटल माहितीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, चोरी झालेल्या रेकॉर्ड्समध्ये नेमकी कोणती ग्राहक माहिती आहे आणि तिचा गैरवापर झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एसबीआयच्या अधिकाऱ्याने बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात हॅकर्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हल्ल्यामागे कोणाचे नेटवर्क आहे, डेटा नेमका कुठे आणि कसा वापरला गेला, याचा तपास बेलापूर सिबिडी पोलीस करत आहेत

86 देश, 18 भाषा, 150 हून अधिक चित्रपट; गोव्यात जागतिक सिनेमाचा महाकुंभमेळा भरणार

Post Office TD Scheme : १ लाख रुपये गुंतवा अन् ५ वर्षांनी मिळवा तब्बल १,४४,९९५ रुपये; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

Milk Price Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झटका! दूधाच्या दरात मोठी वाढ, नवे दर जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग; दिल्लीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या महत्त्वाच्या बैठका

अजितदादा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार नाही? छगन भुजबळांनी सांगितला राजकीय तिढा

SCROLL FOR NEXT