मुंबई ईडीचे सहसंचालक सत्यब्रत कुमार यांची बदली Saam TV
मुंबई/पुणे

मुंबई ईडीचे सहसंचालक सत्यब्रत कुमार यांची बदली

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई अंमलबजावणी संचालनालयासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सुरज सावंत

मुंबई ईडीचे सहसंचालक सत्यब्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई अंमलबजावणी संचालनालयासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देशात अनेक हायप्रोफाईल प्रकरणे आहेत ज्यांची मुंबई युनिट चौकशी करत आहे, या युनिटचे संयुक्त संचालक सत्यब्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे. सत्यब्रत कुमार 7 वर्षांहून अधिक काळ मुंबई ईडीमध्ये कार्यरत होते.

सूत्रांनी सांगितले की डिसेंबर 7 मध्येच त्यांची 7 वर्षे संपली होती, त्यांनी त्यांच्या मुदतवाढीसाठी विनंती केली होती. मात्र त्यांना मुदत वाढ देण्यात आलेली नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या आदेशानुसार, त्यांच्याकडे असलेले सर्व खटले काढून घेण्यात आले आहे. आता फक्त कोळसा घोटाळ्याशी संबधित प्रकरण त्यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहेत. आता त्याच्या जागी कोण येणार हे पाहावं लागेल.

दरम्यान महाराष्ट्रमध्ये ईडी सध्या खूपच चर्चेत आहे. अनेक दिग्गज नेत्यांना ईडीच्यी नोटीसा पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे नेते ईडी केंद्र सरकारच्या हातातलं बाहूलं बनले आहे अशी टीका केली जात आहे. कालच परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने आठ तास चौकशी केली आहे. यापुर्वी अनील देशमुख, राज ठाकरे, भावना गवळी या नेत्यांना ईडीने समन्स बजावले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT