Satish Wagh Case Saam Tv News
मुंबई/पुणे

Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पत्नीने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - '१० वर्षांपासून...'

Satish Wagh Wife Statement: आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच पोलिस चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले आहेत.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेली त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी पोलिस चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. गेल्या १० वर्षांपासून सतीश वाघ मानसिक त्रास आणि शारीरिक वेदना देत होते, अशी माहिती मोहिनी वाघने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. हे हत्याप्रकरण झाल्यापासून एकएक धक्कादायक ट्विस्ट येत आहेत.

मोहिनी वाघने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, सतीश वाघ गेल्या १० वर्षांपासून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. सतीश वाघ यांचेसुद्धा बाहेरील अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध होते. गेल्या अनेक वर्षांपासून सतीश वाघ मोहिनी वाघला मारहाण करत होते. घर खर्चासाठी पैसे न दिल्यास सातत्याने सतीश वाघ मारहाण करत होते.

सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. नेमकी ही हत्या कशासाठी करण्यात आली? तसेच आर्थिक व्यवहार कसे झाले? याचा तापस पुणे पोलिसांकडून सध्या सुरू आहे. सतीश वाघ हत्या प्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

दरम्यान, आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी त्यांची पत्नी मोहिनी वाघने सहा महिन्यांपासून तयारी केली होती. बॉयफ्रेंडच्या मदतीने तिने पतीचा काटा काढला. सतीश वाघ यांना मारण्यासाठी ५ लाखांची सुपारी देण्यात आली होती. ९ डिसेंबरला मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले. चालत्या कारमध्येच त्यांची हत्या करण्यात आली. ७० वेळा वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT