Satish Uke Saam TV
मुंबई/पुणे

नाना पटोलेंचे वकील सतीश उके अन् प्रदीप उकेंना ६ एप्रिलपर्यंत ED कोठडी

काँग्रेस प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके आणि प्रदीप उके यांना अटक केली असून ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात त्यांना मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांनंतर कोर्टाने त्यांना ६ एप्रिल २०२२ पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या दोन तक्रारींच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती.

सतीश उकेंवर जमीन व्यवहारांसंबंधी एका प्रकरणात ईडीने त्यांच्यावर आज छापेमारी केली होती. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील असून त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधातील केसमध्येही ते नाना पटोले यांचे वकील आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

SCROLL FOR NEXT