Deputy CM Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

आताची सर्वात मोठी बातमी! सातारा राड्यावरून एकनाथ शिंदे नाराज; मंत्री आणि आमदारांकडून राजीनाम्याचा इशारा

Eknath shinde news : सातारा राड्यावरून एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती हाती आली आहे. साताऱ्यातील राड्यावरून शिवसेना मंत्री आणि आमदारांकडून राजीनाम्याचा इशारा दिल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

सातारा राड्यावरून महायुतीत अंतर्गत वाद उफाळलाय

जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात तीव्र वाद झाल्याचे पाहायला मिळालं

सातारा राड्यावरून एकनाथ शिंदे यांनी नाराजी केली व्यक्त

सूरज मसूरकर, साम टीव्ही

विधीमंडळात महायुतीतच खडाजंगी पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेत सातारा राड्यावरून मंत्री जयकुमार गोरे आणि शंभुराज देसाई एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी दुखापत झाल्याची तक्रार मंत्री शंभुराज देसाई यांनी केली. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले. याच राड्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. साताऱ्यातील घटनेवरून महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळत असून शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे.

साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी झालेल्या राड्यावरून शिंदेसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांनी विधानपरिषदेत नाराजी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सभागृहात संताप व्यक्त केला. त्यानंतर शिंदेंच्या आमदारांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत मंत्री आणि आमदारांना मिळणारी वागणूक दुय्यम असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शिंदेंच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.

नेमकं काय घडलं?

विधीमंडळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले. त्यानंतर वेगवान घडामोडी घडायला सुरूवात झाली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्याआधी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची एक बैठक झाली.

या बैठकीत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. सातारा राडा प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही, तर आम्ही सर्व मंत्री आणि आमदार राजीनामा देऊ, असा इशारा त्यांनी दिला. महायुतीत वारंवार शिंदेसेनेला दुय्यम वागणूक मिळत आहे. रायगड आणि साताऱ्याची उदाहरणे देण्यात आली. आता भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये. यावर ठोस भूमिका मांडली पाहिजे . या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT