Lalit Patil Case Saam Tv
मुंबई/पुणे

Lalit Patil Case Update : ललीत पाटील प्रकरणात मोठी अपडेट; बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sasoon Hospital Dr Arrested in Lalit Patil Case : शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला होता.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune Crime News :

ड्रग्समाफिया ललीत पाटील प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी जसजसी पुढे सरकत आहे तशी आरोपींची संख्येतही वाढ होताना दिसत आहे. ललील पाटील प्रकरणात आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली आहे. ससून रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी अहवाल शासनास काही दिवसांपूर्वी दिला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला होता.

या चौकशीत अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते दोषी असल्याचे दिसून आले होते. डॉ. प्रवीण देवकाते यांच्या निगराणीखाली ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत होता.  (Latest Marathi News)

पुणे पलिसंच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली. डॉ प्रवीण देवकाते हे ससून रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होते. देवकाते यांनी ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवला, अशी माहिती तपासातून समोर आली.

डॉ. देवकाते यांच्या निगराणी खाली ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत होता. डॉ. देवकाते हा ललित याचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांच्या संपर्कात होता.

ललित पाटील पळून जाण्याचा काही दिवस आधी डॉ. देवकाते यांनी भूषण याच्याशी संपर्क केला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाने या आधीच देवकाते यांचे निलंबन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT