पेटवापेटवीत महाराष्ट्रात एक्सपर्ट कोण आहे ते सगळ्यांना माहीतेय - संजय राऊत Saam TV
मुंबई/पुणे

पेटवापेटवीत महाराष्ट्रात एक्सपर्ट कोण आहे ते सगळ्यांना माहीतेय - संजय राऊत

'आम्हाला माहित आहे टिपू सुलतान यांनी काय केलं, कसे अत्याचार केले काय अन्याय केला. हा सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही काही इतिहासाचे ठेकेदार नाही आहात'

जयश्री मोरे

मुबंई : मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे नाव दिल्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. तसंच या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून त्यांनी टिपू सुलतान नावाला विरोध केला आहे. दरम्यान भाजप नेते राज पुरोहितांनी या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पहिला राजीनामा राष्ट्रपतींचा घ्या -

दरम्यान या सर्व प्रकरणावरती बोलताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवरती निशाना साधला आहे. राऊत म्हणाले, 'टिपू सुलतान प्रकरणावर जर राजीनामा घ्यायचा असंल तर भाजपला पहिलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा राजीनामा घ्यावा लागेल. तसंच जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जर ही भाषा असेल तर आम्हीही बघू टिपू सुलतान प्रकरणाच काय करायचं, त्यासाठी मुंबई महापालिका (BMC) आणि राज्य सरकार पाहिल, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

हे देखील पहा -

तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही -

तसंच 'आम्हाला माहित आहे टिपू सुलतान यांनी काय केलं. कसे अत्याचार केले.,काय अन्याय केला. हा सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही काही इतिहासाचे ठेकेदार नाही आहात' असंही राऊत म्हणाले.

पेटवापेटवीतील एक्सपर्ट सगळ्यांना माहितेय -

'महाराष्ट्रभर आंदोलन करू; महाराष्ट्र पेटवू ही अशी भाषा तुमच्या तोंडात असेल तर या पेटवापेटवीत महाराष्ट्रातील एक्सपर्ट कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. मात्र आम्ही असं काही करत नाही असा टोला राऊतांनी लगावला.

दरम्यान, राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचे कर्नाटकमध्ये गुणगान केले होते त्यामुळे राजीनाम्याची गोष्ट आहे तर सगळ्यात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT