Sanjay Raut ED Custody Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut ED Custody: संजय राऊतांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेले शिवसेना खासदार संजय राऊत हे १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते.

Jagdish Patil

सुशांत सावंत -

मुंबई: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने (ED) अटक केलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) हे १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते. त्याची न्यायालयीन कोठडी आज संपल्यांने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

न्यायालयीन सुनावणीनंतर राऊतांची न्यायालयीन कोठडी आणखी वाढवण्यात आली असून त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

पाहा व्हिडीओ -

३१ जुलै रोजी संजय राऊतांना ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. राऊतांना सुरुवातीला ८ दिवसांची ईडी कोठडी, मग २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी आणि नंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीतील वाढ करण्यात आली होती. आज न्यायालीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, आज भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) आज मुंबईत दाखल झाले असून त्यांनी लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन देखील घेतलं. एकमेकांचे कधीकाळीचे मित्र असणारे भाजप-शिवसेना कट्टर विरोधक बनले आहेत. राऊतांवरील कारवाईला भाजपच कारणीभूत असून ईडीचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप सेनेकडून अनेक वेळा करण्यात येतो.

अशातच शहा मुंबईत असताना राऊतांची कोठडी वाढली आहे. याबाबतचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एका बाजूला शहा दर्शनासाठी निघताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राऊत न्यायालयात हजर होण्यासाठी जाताना दिसतं आहेत. या फोटोची सोशल मिडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडाच्या वादाचा दुसरा अंक; शिवसेना भाजपामध्ये सुप्त संघर्ष

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

SCROLL FOR NEXT