सुशांत सावंत -
मुंबई: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या याच दौऱ्यावर शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून (Saamana) भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेशी (ShivSena) समोरून दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होतं, या शब्दात आजच्या सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच, आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जातेय, शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदानं नाचतोय, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाच्या याच अग्रलेखाला आता भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेवर प्रतिहल्ला केला आहे.
त्यांनी याबाबत एक ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी लिहलं आहे की, 'दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता, पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सर्त्तेत कोण बसले ? फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
मराठी माणसात फूट, ही आरोळी 100% झुट !
महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले, तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे, आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई कि विरार ? कि आणखी त्याच्यापण पुढे?
हे मिशन नव्हे "कमिशन"
कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले बंधू" राजांनी वेगळी चूल मांडली खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले. तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच.
स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय? नाचता येईना अंगण वाकडे, स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.