कुणाला अहंकार नसावा - संजय राऊतांचा भुजबळांकडे रोख?
कुणाला अहंकार नसावा - संजय राऊतांचा भुजबळांकडे रोख? saam tv
मुंबई/पुणे

कुणाला अहंकार नसावा - संजय राऊतांचा भुजबळांकडे रोख?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे suhas kande आणि पालकमंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यातला वाद पुन्हा उफाळला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भुजबळांनी नियोजन समितीच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. यासाठी आता शिवसेना Shivsena आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

जिल्हा नियोजन समितीतील कामे मर्जीतील ठेकेदारांना देऊन गैरव्यवहार केल्याचा कांदे यांनी गंभीर आरोप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला आहे. 14 दिवसांपूर्वी भुजबळ नांदगावच्या पूर परिस्थिती पाहणी दौऱ्यावर असतांनाही कांदे आणि भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पहा -

संजय राऊत म्हणले की, छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. नाशिकचे पालकमंत्री आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी शिवसेना आमदार सुहास कांदे यांना सांभाळून घ्यावं ते ही समीर आणि पंकज यांच्या सारखे आहेत. कोणाला अहंकार नसावा तरच आघाडी सरकार पुढे जाईल असे देखील ते यावेळी म्हणाले.

तर राज्यात सिनेमागृह सुरू करण्याबाबत सिनेमागृह चालक मालक संघटनेसोबत चर्चा झाली. मुंबई हे नाट्यभूमी, सिनेमागृहाच जनक आहे. सिनेमागृह उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू आणि हळूहळू सिनेमागृह सुरू करू दोन वरश्यात सिनेमागृहांची स्थिती खराब असून लाखो लोकांचा रोजगार त्यावर आहे त्यामुळे यावर लवकरच निर्णय घेऊ अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.

तर पूढे संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. ते म्हणले की, मुनगंटीवार हे संवेदनशील आहेत. त्यांच्या भावनांचा नक्की विचार केला जाईल. आपल्या राज्यात महिलांवर अत्याचार व्हावे असे कोणालाही वाटत नाही. स्त्रियांचा सन्मान राखतो वाईट प्रवृत्तीचा नाश करतो. महिलांच्या अत्याचार आणि सन्मानबाबत सरकार संवेदनशील आहे असे देखील ते यावेळी म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

SCROLL FOR NEXT