Sanjay raut News Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : सरेंडर होण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल,VIDEO

Sanjay Raut Latest speech : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Vishal Gangurde

शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातून संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेवरून संजय राऊत यांनी तुफान टीका केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सरेंडर होण्याचं काम नरेंदर आणि देवेंदर यांचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं रोपटं नाही. तर झाडच लावलं होतं. या झाडाला ५९ वर्षे होत आहे. हा देशातील चमत्कार आहे. आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. आज एक हॉरर शो झाला. थरारक सिनेमा झाला. एक मंत्री अघोरीबाबासह बसला होता. हा मंत्री टॉवेलवर उघडाबंब बसला होता. या अघोरीबाबाकडे कवटी होती. हा सिनेमा सकाळी पाहिला. या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा कार्यक्रम डोम येथे होत आहे. आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही. शिवसेनेला सातत्याने कार्यक्रम बाळासाहेबांनी दिला असेल तर विचार देण्याचा कार्यक्रम दिला. अंबादास दानवेंनी मराठवाड्यात आंदोलनाचा कार्यक्रम केला.

बाळासाहेबांनी या शिवसेनेची स्थापना केली आहे. ज्यांचा जन्म दोन वर्षापूर्वी झाला. त्यांनाही वाटत आहे की, त्यांना आपण ५९ वर्षांचं झाल्याचे वाटत आहे. त्यांचा स्थापना दिवस सूरतला झाला पाहिजे. तुमच्या पक्षाची स्थापना गुजरातमध्ये झाली आहे. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. भाजपने त्यांच्या पक्षासाठी स्पॉन्सरशिप करावी. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की, भारतात दोनच सेना राहील. एक शिवसेना आणि दुसरी भारतीय सेना.

वाघ शरण जात नाही. वाघ गवत खात नाही. हे वाघ अमित शहा यांचे गवत खात आहे. शिवसेना राजकारणातील जुना पक्ष आहे. भारतातील अनेक पक्ष शिवसेनेच्या स्थापनेनंतर झाले आहेत. शिवसेनेने अनेक तुफान झेलले आहेत. आमचा संघर्ष संपला नाही.

बाळासाहेबांनी माणसांची माकडे केली. त्या माणसांना सरदार केलं. त्या सरदारांनी आमच्या पाठित घाव केले. तरीही शिवसेना झुकली नाही. कोणाच्या चरणी बसली नाही. त्यांना एक ट्रम्पचा फोन येतो. आणि ते सरेंडर येतात. सरेंडर होण्याचं काम नरेंदर आणि देवेंदर यांचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT