Devendra Fadnavis and Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

राऊतांनी भावनिक उत्तर न देता कायद्याने द्यावे; नोटीस पुराव्यांच्या आधारे- फडणवीस

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि त्यांनाच लुटायचं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित ११ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. तर राऊत या कारवाईला म्हणाले होते, संपत्तीतील एकही रुपया गैरमार्गाने आला असेल तर सर्व संपत्ती भाजपला दान करणार. आता विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही या कारवाईबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई पुराव्यानिशी तसेच नोटीस देऊन झाली आहे, त्यामुळे कायद्याने उत्तर द्या असे फडणवीसांनी राऊतांना स्पष्ट सांगितले आहे.

"नख कापून शहिद होण्याचा त्यांच्या प्रयत्न"

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही लोकांचा प्रयत्न असतो नख कापून शहिद होण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. त्यामुळे मला वाटत की, लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता ते असं करत आहेत. आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आत माणसं घुसवून घुसवून त्यांची मापं घेऊन घेऊन नसलेल्या नोटीशी देण्याचे काम झाले परंतु आम्ही तीच भूमिका घेतली की, आम्ही कायद्याने सर्वांचे उत्तर देऊ. त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या आधारे नोटिसेस मिळाल्या आहेत. याच कायद्यानेच त्यांनी उत्तर दिले पाहिजेत. भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

हे देखील पहा-

"मराठी माणसाला लुटायचा धंदा कोण करतंय हे स्पष्ट"

पुढे ते म्हणाले, "पत्राचाळ आहे ही गरीब मराठी माणसाचा प्रश्न होता. जो अनेक वर्ष याकरिता भिजत पडला कारण ज्यांना स्वतःला त्या लोकांचा मसीहा म्हणून घोषित केलं होत त्यांनीच त्यांचे सर्व पैसे बिल्डरच्या घश्यात घातले. जेव्हा मी मुख्यमंत्री होते तेव्हा या संदर्भसातल्या कारवाया मी केल्या. पण त्याचा वेळी आता हे पर्दाफाश होतोय कि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटायचा हा धंदा या मुंबईत कोण करतय हे आता स्पष्ट होत आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT