Sanjay Raut News SAAM TV
मुंबई/पुणे

Lok sabha Election 2024 : महाविकास आघाडीचं ठरलं! आता एकच बैठक होईल; संजय राऊतांनी सांगितली लोकसभेसाठीची पुढची दिशा

Maha Vikas Aghadi Lok sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडलं आहे. आता एकच बैठक होईल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लोकसभेसाठीची पुढची दिशा सांगितली.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Lok sabha Election 2024 :

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपाबाबत मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांनीही हजेरी लावली. या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाबद्दल चर्चा झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.'वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडलं आहे. आता एकच बैठक होईल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लोकसभेसाठीची पुढची दिशा सांगितली. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत बैठक झाल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, 'लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे दुरध्वनीवरुन माहिती घेत होते. वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आला आहे, तो मोठा वाटत असला तरी तसं नाही. वंचित बहुजन आघाडीने तयारी केल्या, त्या जागा त्यांनी सांगितल्या. आम्ही प्रत्येक जागेवर चर्चा केली'.

'आम्हाला जिंकणे हे महत्वाचे आहे. कोणती जागा कोणाला मिळेल,यासंदर्भात वाद नाही. आम्ही चार पक्ष मानतो, इतर घटक पण आहेत. मात्र मुख्य चार पक्ष आहेत. वंचित हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक पक्ष आहे, असे ते म्हणाले.

'वंचित बहुजन आघाडीने २७ जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही. ज्यांची ताकद कुठे आहे, त्यासंदर्भात देखील चर्चा होत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचं देखील मार्गदर्शन होतं आहे, असे राऊत म्हणाले.

'आता यापुढे कोणत्याही बैठका होणार नाही. वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडलं आहे. आता एकच बैठक होईल. त्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतील, त्यानंतर पत्रकार परिषदेत जागावाटपाविषयी सांगितलं जाईल, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT