मयूर राणे, साम टीव्ही
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा सुपडासाफ झाला आहे. आम आदमी पक्षाने दशकाभरापासून असेलली सत्ता गमावली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ वर्षानंतर विजयाचा झेंडा फडकावला आहे. अरविंद केजरीवाल आणि 'आप'च्या पराभवानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनीही पराभव मान्य केला आहे. याच दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपच्या पराभवाचं कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगतिलं आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी आम आदमी पक्षाच्या पराभवाचं मुख्य कारण सांगितलं. संजय राऊत म्हणाले,'अरविंद केजरीवाल दिल्लीत १० वर्षे सत्तेत होते. आम आदमी पक्ष आंदोलनातून आलेला पक्ष आहे. मात्र महासत्ता, पैशांच्या यंत्रणेपुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. तिथेही महाराष्ट्राचा पॅटर्न राबवला आहे. मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन पराभूत झाले आहेत. प्रत्येक निवडणुकीत हार आणि जीत महत्त्वाची असते. राज्यात मतदार याद्यांमध्ये घोटाळे झाले. आम्ही भिंतीवर डोके आदळतोय, पण निवडणूक आयोग आमचे ऐकत नाही. हरियाणा दिल्लीत दोघे एकत्र आले नाही, त्याचा फायदा भाजपला झाला'.
'दिल्लीत मतदार याद्यातून हजारो नाव गायब करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. दिल्लीतील रिकामे बंगले आहेत. त्यात कोणी राहत नाही, त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आपचा पराभव काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढल्यामुळे झाला आहे. आमच्या इंडिया ब्लॉकमधील दोन पक्ष एकत्र आले असते, तर निकाल वेगळा लागला आसता. फरक फार मोठा नाही. काँग्रेस आणि आपचे ५० टक्के मत आहे आहे', असे राऊत पुढे म्हणाले.
'इंडिया आघाडीतील नेत्यांनी ठरवलं पाहिजे. महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत राबवला. लातूर पॅटर्न राबवला, तसा राबवला. आता लातूर पॅटर्न कुठे आहे? राजकारणात अघोरी पॅटर्न काही काळ चालतो. महाकुंभमध्ये मोदी गेले, तसेच कन्याकुमारी कुठे कुठे जातात. मतदानाच्या दिवशी जातात. मी किती कडवट हिंदू आहे. हे दाखवायचा प्रयत्न आहे. धर्माची अफूची गोळी द्यायची. ते ध्यानस्थ बसलेले, पण कॅमेरे लागलेले आहेत. हे लोकांनी पहावं आणि मतदान करावं, असेही राऊत पुढे म्हणाले.
'नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी ठरवले होतं की, पडेल ती किंमत देऊन अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. निवडणुकीत खोटे मतदान करण्यात आलं. महाराष्ट्रात हे घडलं, पण आमच्या उशिरा लक्षात आलं. उद्धव ठाकरें यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली नव्याने विचार करावे लागेल, ते सर्वांशी बोलतील, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.