Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: सेनेच्या 'बाणाने' सोमय्या 'घायाळ'; निल सोमय्या अन् वाधवान कनेक्शन उघड

राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे-तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती.

राऊत देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लक्ष्य करणार की किरीट सोमय्यांवर तोफ डागणार, गिरीश महाजन-आशिष शेलार-चंद्रकांत पाटील यापैकी कोण नेते राऊतांच्या रडारवर असतील, याबाबात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मुंबईच्या शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होत आहे. संबंध महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. (Sanjay Raut Press Conference)

PMC बँक घोटाळा

महाआयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा भाजप सरकारच्या काळातला हा मोठा घोटाळा आहे. त्यातील महत्त्वाच्या लोकांना भाजपने लपवून ठेवला आहे. राकेश वाधवानच्या खात्यात २० कोटी गेले आहे. PMC बँक घोटाळ्यामधील राकेश वाधवान यांच्या खात्यावर भाजपच्या खात्यातून हे पैसे गेल्याचे राऊतांनी सांगितले आहे. सोमय्यांचा मुलगा निल सोमय्या हे राकेश वाधवानचे पार्टनर असल्याचे राऊतांनी सांगितले आहे. वाधवान यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्या जमीनी नावावर करुन घेतल्या आहेत. PMC बँक घोटाळा प्रकरणी निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांनी अटक करावी असे राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांवरती गंभीर आरोप

सोमय्यांनी ठाकरे कुटुंबीयांवरती आरोप केले की ठाकरे कुटुंबाचे अलिबागमध्ये १९ बंगले आहेत. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले किरीट सोमय्यांना मी आव्हान करतो की त्यांनी १९ बंगले दाखवावे मी राजकारण सोडून देईल, आपण सर्व पत्रकार त्या १९ बंगल्यामध्ये पिकनीकला जाऊ, जर तिथे बंगले नाही निघाले तर शिवसेना सोमय्यांना जोड्याने मारेल अशी गंभीर टीका राऊतांनी केली आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्यांचा उल्लेख मुंलूंडचा भडवा, दलाल असाही राऊतांनी केला आहे. आनंदराव अडसूळ, भावना गवळी, अनिल परब हे आमचे नेते निर्दोष आहेत. त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जातोय.

सरकार पाडण्याचा प्रयत्न....

पत्रकार परिषदेच्या सुरवातीला संजय राऊतांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन केले. वर्षा बंगल्यावरुन मुख्यमंत्री पत्रकार परिषद पाहत असल्याचं राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे मला फोन आले आणि 'राऊत तुम आगे बढो' असे म्हणाल्याचंही त्यांनी सांगितले. पाठित वार केले तरी शिवसेना शात बसणार नाही असं राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की बाळासाहेबांनी मंत्र दिला आहे तू काही पाप केलं नसेल गुन्हा केला नसेल, कुणाच्या बापाला घाबरु नको. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. मला भाजपचे काही नेते भेटून बोलले तुम्ही सरकारमधून बाहेर पडा नाहीतर तुम्हाला जाम करु असे आरोप संजय राऊतांनी केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय आश्रमातील भयंकर प्रकार उघड; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत आढळला मृतदेह, नंदुरबार हादरलं

PPF Calculation: PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग हे नवं कॅल्क्युलेशन घ्या समजून, नाहीतर गमावाल लाखो रुपये

नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराजांएवढी; जैन मुनींचं वादग्रस्त विधान

MI vs DC : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन अचानक बदलला, नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra Live News Update : मुंबईच्या जोगेश्वरी भागात मद्य प्राशन पत्नीने केला पतीवर चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT