Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: शिवसेना भाजपच्या 'नोटांना' पुरून उरेल; संजय राऊतांचे खुले आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा.

जयश्री मोरे

मुंबई - राज्यात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही असे व्यक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. तसंच शिवसेनेने आपलं डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावं असा देखील फडणवीस म्हणले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसयांच्या व्यक्तव्याला शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणले की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमधून तिकडे गेलेले आहेत आणि ते तिकडे गेल्यावर भाजप (BJP) तिथे फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपाचे आमदार प्रवीण झाटे ते देखील भाजप सोडून गेले. तेव्हा त्यांनी आधी पक्षांतर्गत जे काही युद्ध सुरू आहे ती लढाई करावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हे देखील पहा -

दरम्यान संजय राऊत यांना फडणवीसांनी नोटासंबंधी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, आमची लढाई खरोकरच गोव्यामध्ये नोटांशी आहे. भाजप पक्ष गोव्यात खूप नोटा वाटत आहे आणि महाराष्ट्रातून गोव्यात कसे नोटा जात आहेत ते आम्ही बघत आहोत. त्यामुळे शिवसेना गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि गोव्यातील जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न करेल दबावाखाली येऊ नका. शिवसेना हा पक्ष सामान्यांचा, बहुजनांना, हिंदुत्ववादी आहे. शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल हे मात्र नक्की. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका तुमच्या नोटांशी आम्ही लढू.

मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडतील? आणि शरद पवार पंतप्रधान कधी होतील? याबद्दल संजय राऊत यांनी सांगावं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना देखील उत्तर दिलं आहे. योग्य वेळी त्यांना माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाचा अद्याप शोध लागेना... 48 तास उलटून शोध सुरूच.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर मालकाला बसला झटका, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT