Aurangabad: आधी जात विचारली, मग घर विकण्यास नकार, बिल्डरविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद शहरातील सिडको एन-२ येथील अडव्होकेट महेंद्र गंडले हे ७ जानेवारी रोजी पत्नी, मुलांसह भाईश्री ग्रुपची भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट पाहण्यासाठी आणि रो हाऊस बुक करण्यासाठी गेले. त्यातील एक रो हाऊस आवडल्यामुळे त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली.
Chikalthana Police Station
Chikalthana Police Stationडॉ. मधाव सावरगावे

औरंगाबाद - पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी आणखी घटना औरंगाबाद (Aurangabad) शहरात समोर आली आहे. अनुसूचित जातीमधील एका उच्चशिक्षित वकिलाला घर विक्री करण्यास बांधकाम व्यवसायिकांने नाकारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा पोलीस (Police) ठाण्यात एका बांधकाम व्यवसायिकासह सहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराजवळील हिरापूर (Hirapur) येथे नवीन रो हाऊस बुक करण्यासाठी गेलेल्या एका वकिलाच्या कुटुंबाला बांधकाम साइटवरील कर्मचाऱ्यांकडून जात विचारण्यात आली. (Aurangabad Latest Crime News)

हे देखील पहा -

त्यांनी अनुसूचित जातीचे असल्याचे सांगितल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घर दाखवण्यास टाळाटाळ केली. अशी अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे वकील महेंद्र गंडले यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भाईश्री ग्रुपचे मकरंद देशपांडे, सोमाणी, जैन, बांधकाम साइटवरील कर्मचारी योगेश निमगुडे, सागर गायकवाड व इतर यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील सिडको एन-२ येथील अडव्होकेट महेंद्र गंडले हे ७ जानेवारी रोजी पत्नी, मुलांसह भाईश्री ग्रुपची भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट पाहण्यासाठी आणि रो हाऊस बुक करण्यासाठी गेले. त्यातील एक रो हाऊस आवडल्यामुळे त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गंडले यांना जात विचारली. त्यावर गंडले यांनी अनुसूचित जातीचे असल्याचे सांगितले.

Chikalthana Police Station
अकोल्यात तूर सात हजारांवर; तुरीची विक्रमी दराकडे वाटचाल

त्यावर तुमच्या जातीच्या लोकांना घर देता येणार नाही असे त्याने सांगितले. त्यानतंर आपण बिल्डरचे कार्यालय गाठून घराची चौकशी केली, तिथेही जात विचारून घर नाकारण्याचा आरोप गंडले यांनी केला आहे. जातीवरून घर नाकारून बिल्डरने आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप करत अडव्होकेट गंडले यांनी या सर्वांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीची तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com