Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Shivcharitra: सेनेच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूंनी ताे धडा समजून घ्यावा : संजय राऊत

तिथीनूसार आज राज्यातील विविध भागात शिवजयंती साजरी केली जात आहे.

जयश्री मोरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी (chhatrapati shivaji maharaj) महाराष्ट्रातील दुश्मनांना एकच धडा चारशे वर्षांपूर्वी घडवून दिला. महाराष्ट्र दुश्मना पुढे झुकणार नाही. वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि जर दुश्मन अंगावरती आला त्याची बोटे छाटली जातील. प्रतापगडावर तर अफजल खानाचा कोथळा निघाला. पंचवीस वर्षे लढून सुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये मृत्यू पत्कराव लागला. हा शिवचरित्राचा (shivcharitra) इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला माहिती असून शिवसेनेच्या दुश्मनाने समजून घेतलं पाहिजे असा इशाराच खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सेनेच्या (shivsena) विराेधकांना दिला आहे. (sanjay raut latest marathi news)

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज राज्यात तिथीनूसार जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर सामनाच्या अग्रलेखात शिवचरित्र मांडण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांना त्याविषयी माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले छत्रपती शिवराय यांचे स्मरण दरराेज महाराष्ट्राला होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील दुश्मनांना एकच धडा चारशे वर्षांपूर्वी दिला आहे.

हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. शिवसेनेच्या दुश्मनांनी ते समजून घेतलं पाहिजे असेही राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले शिवसेना खासकरून हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून, प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. हा भगवा जो आज फडकत आहे. आज अचानक ज्यांना भगव्याचे प्रेम उफाळून आले आहे त्याचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे कोणाला असे वाटत असेल दिल्लीचे तक्तचा वापर करून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील नेत्यांना आम्ही झुकवू तर तसं नसून आम्ही मात्र त्यांना गुडघे टेकायला लावू. त्यामुळे शिवचरित्र त्यांनी वाचायला हवं असेही राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT