Shiv Sena Anniversary Celebration Saam Tv News
मुंबई/पुणे

Raj-Uddhav Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार, आज शिवसेना मेळाव्यात घोषणा होण्याची शक्यता

Shiv Sena Anniversary Celebration : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मनोमीलन आणि शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अशा अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत.

Prashant Patil

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मनोमीलन आणि शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अशा अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. मात्र त्याचवेळी गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला वेगळंच वळण मिळालं. त्याचदरम्यान जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटातर्फे जाहीर करण्यात आली. मग त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आहे का? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. 'आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, मराठी माणसाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे', असं म्हणत राऊतांनी युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम दिलेला नसून ती दारं अद्याप खुली असल्याचं सूतोवाच केलं.

'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही राज्याच्या जनतेची, लोकांची इच्छा आहे. त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरेंनी केला आहे. तो वेगळा विषय आहे, महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे. आज संध्याकाळी वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी मला अपेक्षा आहे', असेही राऊत म्हणाले.

'या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. आज आमचा वर्धापन दिन आहे. काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरा करत आहेत. माझ्या घरासमोर त्यांच्या जाहिराती लागल्या. त्यावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला आहे. काय संबंध त्यांचा बाळासाहेब ठाकरेंशी? त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नाही. त्यांनी संस्थापक म्हणून अमित शाह यांचा फोटो टाकला पाहिजे', असा टोला देखील राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. 'त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शाह किंवा मोदी आहेत. त्यांनी समोर अमित शाह यांचा फोटो टाकला पाहिजे. त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरातमध्ये अहमदाबाद किंवा सुरतला केला पाहिजे. त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?' असा सवालही संजय राऊतांनी यावेळी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

SCROLL FOR NEXT