'मुख्यमंत्री आजारी आहेत माणूसकी दाखवा; मोदीही संसदेत दिसले नाही त्यांचं काय' Saam Tv
मुंबई/पुणे

'मुख्यमंत्री आजारी आहेत माणूसकी दाखवा; मोदीही संसदेत दिसले नाही त्यांचं काय'

थोडीशी माणूसकी दाखवायला पाहिजे अजून अधिवेशन तीन दिवस आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) जिथे आहेत तिथुन अधिवेशनाचा कामकाज सुरळीत ठेवत आहेत.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अधिवेशनावर आणि मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थीतीवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पण संसदेत प्रधान मंत्र्यांना शोधत होतो ते येतील परंतु ते सगळीकडे दिसत होते, पण मला ते संसदेत दिसले नाहीत, अशी खोचक टीका राऊतांनी (Sanjay Raut) मोदींवर केली आहे. संसदेची परंपरा आहे की पंतप्रधानांनी (Narendra Modi) अधिवेशन काळामध्ये दोन्ही अधिवेशनामध्ये हजर राहणे गरजेचे आहे आणि ते तंदुरुस्त आहेत. मुख्यमंत्र्यांची तब्येत मधल्या काळामध्ये थोडीशी बरी नव्हती त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती त्याचा इतका गाजावाजा करण्याची गरज विरोधी पक्षाला नाही असे राऊत म्हणाले.

थोडीशी माणूसकी दाखवायला पाहिजे अजून अधिवेशन तीन दिवस आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) जिथे आहेत तिथुन अधिवेशनाचा कामकाज सुरळीत ठेवत आहेत. पुढल्या तीन-चार दिवसात मुख्यमंत्री सभागृहात विरोधी पक्षाला दिसतील अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिली आहे. रामजन्मभुमी घोटाळा प्रसंगीही संजय राऊतांनी भाष्य केले. मुंबईतल लहानसहान गोष्टी, भूखंड, महाराष्ट्रातील साखर कारखाने त्यांचे व्यवहार हे सध्या राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला उपक्रम आहे.

काल जे अयोध्येतलं प्रकरण आलेलं आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या परिवाराने जमिनी विकत घेतल्या आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी लढले कोण? मेले कोण? आणि रामाच्या नावावर पैसे जमा करते कोण? हा प्रश्न या नकली हिंदुत्ववाद्यांना विचारणे गरजेचे आहे आणि आम्ही तो विचारला आहे. जे ED आणि मनी लॉंडरिंग चे स्पेशालिस्ट आहेत त्यांनी त्यांचे कार्यालय आयोध्या राम जन्मभूमी परिसरात थाटलं तर ते राष्ट्रावरती उपकार होतील.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT