sanjay raut devendra fadnavis
sanjay raut devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

संजय राऊत रोजच जोकरसारखी स्टेटमेंट करतात; फडणवीसांचा टोला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत-

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) हे रोजच जोकरसारखी स्टेटमेंट देत असतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगवाला आहे. फडणवीस आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

'ईडी आम्हाला भाडे तत्वावर द्या, मग देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) देखील महाविकास आघाडीला मतदान करायला लावेन.' असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. याबाबत एका पत्रकाराने फडणवीसांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'राऊतांना आपण जोकर म्हणणार नाही मात्र, ते रोजच जोकर सारखी स्टेटमेंट करत असतात असं फडणवीस म्हणाले.

तसंच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये (Legislative Council Election) भाजपचा पाचवा उमेदवार निवडून येईल असा विश्वास देखील फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षात अस्थिरता असून काँग्रेसने त्यांचा एक उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने ही निवडणुक होणार आहे. जर त्यांनी आपला उमेदवार मागे घेतला तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती मात्र आता ११ उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक होत असल्याचं फडणवीस म्हणाले.

हे देखील पाहा -

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला कारण, आमच्याकडे आम्ही सहा लढवायचे की पाच अशी चर्चा झाली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी आपण पाच जागा लढवुया असं सांगितलं आम्ही सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेतला असल्याचं ते म्हणाले.

तसंच पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत, त्या राष्ट्रीय स्थरावर काम करत आहेत. आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो. असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेची उमेदवारी का दिली नाही या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri News : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, रत्नागिरीत 3 कोटींची रोकड जप्त.. | Marathi News

Sharad Pawar Health News: एक दिवसाच्या ब्रेकनंतर शरद पवार पुन्हा एकदा झंजावाती दौऱ्यासाठी सज्ज! मोठी Update समोर

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT