Sanjay Raut on Ajit Pawar
Sanjay Raut on Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut Tweet: संजय राऊतांनी सांगितला जागावाटपाचा नवा 'फॉर्म्युला'; पुणे लोकसभेच्या जागेबाबत सूचक ट्विट

Shivani Tichkule

Political News Today: भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे पुण्याच्या जागेवर दावा ठोकला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसला (Congress)या जागेवर सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मिळावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. तर दुसरीकडे या वादामध्ये आता संजय राऊतांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे. या ट्विटमुळं चर्चेला उधाण आलं आहे.

संजय राऊत यांचे ट्विट

“कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्तर ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे (Pune) लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र व देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकानं थोडा थोडा त्याक करावाच लागेल. जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अजित पवार, नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खर्गे या तिघांना टॅग केलं आहे. (Political News)

काय म्हणाले होते अजित पवार?

पुण्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद जास्त आहे त्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवी. २०१९मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. त्यावेळी ती जागा काँग्रेसकडे गेली होती. मात्र, काँग्रेसला या जागेवर सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी अजित पवारांनी (Ajit Pawar) केली आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे पुण्याची जागा राष्ट्रवादीला जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हा दाखल होताच आरोपीचे वडील पसार, पोलिसांकडून शोध सुरू

Maharashtra Rain Alert: राज्यात आजही पावसाचा इशारा, तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस, वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, प्रलंबित कामे होतील पूर्ण; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

SCROLL FOR NEXT