Sanjay Raut Latest News, Shivsena News in Marathi, Latest Politics News in Marathi, Eknath Shinde Latest News Update, Sanjay Raut Latest Tweet saam tv
मुंबई/पुणे

जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो..." संजय राऊतांचे सूचक ट्विट

संजय राऊत यांच्या या ट्विटचा काय अर्थ आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्या सोबत घेत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. या सर्व प्रक्रियेला न्यायालयाच्या पातळीवर त्यांना झालेली मदत पाहता शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. एकीकडे ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येनं शिंदे गटात सामील झाले आहेत तर दुसरीकडे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार की जाणार? याविषयी आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत ट्वीटमध्ये?

जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र ! असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा काय अर्थ आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Sanjay Raut Latest Tweet)

कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा" असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना केले आहे.

शिवसेनेचं चिन्ह जाणार?

एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद पाहता आणि खचलेली शिवसेना पाहता शिवसेनेचे निवडणुकीसाठी वापरले जाणारे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे देखील शिवसेनेकडून हिसकावले जाऊ शकते. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता हे संकट झेलण्याचाही तयारी ठेवली आहे. राज्यात या वर्षी मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह पोहचवण्याचं आव्हान शिवसेनेपुढे असेल. त्यामुळे हा ठाकरे यांच्या गटासाठी एक मोठा धक्का असू शकतो. (Shiv Sena Latest News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND Vs UAE : भारताने यूएईचा धुव्वा उडवला, सामना २७ चेंडूंमध्ये संपवला; टीम इंडियाची विजयी सुरुवात

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील २ आरोपींचा जामीन न्यायालयाने नाकारला

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

SCROLL FOR NEXT