Sanjay Raut News  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut On PM Modi : संजय राऊत यांचा राज्यातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल; म्हणाले, 'पंतप्रधानांना मुंबईत...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर जोरादार टीकास्त्र सोडलं.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर जोरादार टीकास्त्र सोडलं आहे. 'पंतप्रधानांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं राज्यातील नेतृत्व कमकुवत आहे असा याचा अर्थ होतो, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दोन वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला समर्पित केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, 'मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांच्या पक्षाने फार गांभीर्याने घेतल्या आहेत. पण देशासमोर वेगळे प्रश्न आहेत. संसदेत विरोधकांनी अदानीच्या खिशात एवढा पैसे कुठून आला याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याचे उत्तर पंतप्रधान मोदी द्यायला तयार नाहीत, पण ते निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत'.

'पंतप्रधानांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं इथलं राज्याचं नेतृत्व कमकुवत आहे असा याचा अर्थ होतो. यापूर्वी कधी नव्हे इतके पैसे केंद्राकडून राज्याला मिळाले असं म्हणणं म्हणजे यापूर्वी केंद्र महाराष्ट्राला सूडबुद्धीने वागवत होते हे स्पष्ट होतं. असं करून त्यांनी महाराष्ट्राची वैर घेतलेलं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे.

आगामी मुंबई महापालिकेवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली. 'सरकार डबल इंजिनचा असो ट्रिपल किंवा चार इंजिनचं असो. अथवा हवेत उडणारं असो मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

पुण्यातील पोटनिवडणुकीवर संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'राहुल कलाटे यांना शिवसेनेने उमेदवारीचा प्रस्ताव दिलेला नव्हता. कलाटे कुठल्या पक्षाकडून उमेदवारी घेणार होते हे मला माहीत नाही. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे हे मला तुमच्याकडूनच कळतंय. लोकशाहीत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Doctors Strike : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण, राज्यभरातील 30 हजार डॉक्टर संपावर! | VIDEO

Sambhajinagar : संभाजीनगरचे वातावरण तापलं, शहरात “आय लव मोहम्मद”चे बॅनर

World Cup : महिला संघावर BCCI चा ५१ कोटींचा वर्षाव, हरमनप्रीत कौर दिग्गजांच्या पंक्तीत

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

HSC-SSC Exam : दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT