Sanjay Raut News  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut on Shinde Group: 'वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघाले गोरेगावला'; संजय राऊत यांचा शिंदे गटावर घणाघात

'वाघाचे कातड पांघरून लांडगे गोरेगावला निघाले, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला हाणाला आहे

जयश्री मोरे

Sanjay Raut News: मुंबईत १९ जून रोजी शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे करण्यात येणार आहे. ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृह सायन येथे वर्धापन दिन साजरा होणार आहे. तर शिंदे गटाचा गोरेगावातील नेस्को संकुलात होणार आहे. या वर्धापनासाठी शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. 'वाघ निघाले गोरेगावला...' अशी पोस्टरबाजी शिंदे गटाने वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. यावरून वाघाचे कातडे पांघरून लांडगे गोरेगावला निघाले, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला हाणाला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. संजय राऊत म्हणाले,'मिंदे गटाचे काही पोस्टर येताना पाहिले. वर्धानपन दिनाला वाघ निघाले गोरेगावला, असं त्या पोस्टरवर लिहिलं होतं. त्यांनी एकदा मराठी नीट शिकून घ्यावं. ते वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघाले गोरेगावला, असं त्यांनी करायला पाहिजे'.

संजय राऊत पुढे म्हणाले, 'पक्षाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज उद्धव ठाकरे हे या ठिकाणी आलेल्या वाघांना मार्गदर्शन करतील. आगामी निवडणुका तर पुढे आहेतच. आपण पुढे पक्षाची वाटचाल नेमकी कशी असणार, त्याबद्दल आजच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन होईल. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे दुसरा कुठलाही प्रस्ताव इथे मांडला जाणार नाही, ही काय राष्ट्रीय कार्यकारिणी नाही हे एक शिबिर आहे'.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, 'चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्य नीट असं माहीत नाही. त्यामुळे ते काय बोलतात, माहीत नाही. त्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नका'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT